मुंबई- मनी लॉंडरिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या सुनावणीनंतर मालिकांना आता २० मे पर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.
मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी ईडीकडून मलिक यांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने फक्त ८ दिवसांचीच कोठडी मंजूर केली होती. मनी लॉंडरिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी नवाब मलिक यांच्या विरोधात ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.