बीजिंग- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आशियायी क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. चिनी माध्यमांकडून ही माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
आशिया ऑलिम्पिक कौन्सिलने शुक्रवारी सांगितले की, 10 ते 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे होणार्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. मात्र, आता या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. चीनमध्ये कोविड-19 संबंधित प्रकरणे सातत्याने वाढत असल्याने ही घोषणा करण्यात आली आहे असे या अहवालात म्हटले आहे.
2022 आशियाई खेळ जे सप्टेंबरमध्ये हांगझोऊ येथे होणार होते ते आता पुढे ढकलण्यात आले आहेत. चीनच्या राज्य माध्यमांनी शुक्रवारी या संदर्भात माहिती दिली. आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यामागे ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाने कोणतेही कारण दिलेले नाही, मात्र चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे मानले जात आहे.