नवरात्री म्हणजे रंगोत्सव ; साड्या तयार आहेत ना ? वाचा या वर्षी कोणत्या रंगाची साडी केव्हा नेसायची आहे ते … !

654 0

आपले प्रत्येकच सण हे काहीतरी विशेष देखील घेऊन येतात. त्यामुळे परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होतानाच प्रत्येक भाविक त्या सणाचा आनंद देखील घेतच असतो. खरं तर साडीचा रंग आणि नवरात्रीचे नऊ दिवस यांचा काहीही संबंध नाही. काही असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. पण एकीकडे उपास , देवीची आराधना, घर-संसार संभाळताना काहीच हरकत नाही हे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालून आनंद लुटायला… चला तर मग पाहूयात नवरंगांचा मेळ यावर्षी कसा आहे …

यावर्षी २६ सप्टेंबरला सोमवारी घट बसणार आहेत . घटस्थापनेची सगळी तयारी झाली असेल तर नऊ साड्या तयार ठेवा . तर मग पहिल्या दिवशी अर्थात

२६ सप्टेंबरला सोमवारी पहिला रंग आहे पांढरा.

मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी नेसायचे आहे लाल रंगाची साडी

बुधवारी 28 सप्टेंबर रोजी नेसायची आहे निळ्या रंगाची साडी

गुरुवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी नेसायची आहे पिवळ्या रंगाची साडी

शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी नेसायची आहे हिरव्या रंगाची साडी

शनिवारी एक ऑक्टोबर रोजी आहे राखाडी रंगाचा मान

रविवारी 2 ऑक्टोबरला आहे केशरी रंगाचा मान

सोमवारी 3 ऑक्टोबर रोजी मोरपंखी रंगाची साडी नक्की खुलवेल तुमचे सौंदर्य

आणि मंगळवारी 4 ऑक्टोबरला गुलाबी रंगाची नेसा साडी

तर मग घरातली सगळी आवराआवर झालीच असेल, चला तर मग साड्या आणि त्यावरील डाग दागिने मॅचिंग शोधायला सुरुवात करा…

Share This News
error: Content is protected !!