रामनवमी निमित्त खासदार नवनीत राणा यांच्या रामभक्तांना अनोख्या शुभेच्छा.. पहा व्हिडिओ

288 0

रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

आज रामनवमी निमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एक व्हिडिओ शेअर करत रामभक्तांना अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काळा पंजाबी ड्रेस आणि भगवं उपरणं घेतलेल्या नवनीत राणा जय श्रीरामचा गजर करत बुलेटवर स्वारी करताना दिसत आहेत.

‘ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है..’ जय श्रीराम असे म्हणत नवनीत राणा बुलेटवरून स्वारीला निघतात. एका निर्मनुष्य रस्त्यावरून धडाक्यात बुलेट चालवताना दिसतात. पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री असल्यामुळे त्यांचा अभिनय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ आता चर्चेत आला आहे.

मुंबईत आणि अमरावतीमध्ये बॅनरबाजी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर त्यांनी हनुमान चाळीस पठण केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन १४ दिवसांचा तुरुंगवास घडला होता. या सर्व घटनाक्रमाचे फोटो असलेले भव्य बॅनर अमरावती तसेच मुंबईतही झळकवण्यात आले आहेत.

अमरावतीमध्ये साकारणार भव्य हनुमान मूर्ती

येत्या ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि नवनीत राणा यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामार्फत सामुहिक हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम होणार आहे. अमरावतीत येत्या काही दिवसात १११ फुट उंचीची भव्य हनुमान मूर्ती विराजित केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम या दिवशी केला जाईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!