राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज नारायण राणेंनी घेतली भेट; चर्चेचा विषय मात्र गुलदस्त्यात

452 0

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आज नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राणे आणि राज ठाकरेंची ही सदिच्छा भेट असल्याची चर्चा असली तरी, मात्र नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली हे समजू शकले नाही.

मागच्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला नवीन विषय मिळाला आहे.

Share This News
error: Content is protected !!