“नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्री पद जातंय…!” संजय राऊत यांनी राणेंच्या मंत्रिपदाविषयी केले मोठे भाष्य, सांगितली ही कारण…

336 0

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊत यांना थेट अरे तुरेची भाषा करून तू कधी रे कानफटात खाल्ली खाल्ली ? का मोठा भाईगिरी दाखवतो ? आम्हाला या दाखवतो असं आव्हान संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिले.

यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्री पदाविषयी देखील मोठ भाष्य केले. ते म्हणाले की, “माझ्या माहितीनुसार नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रीपद जातंय त्याला कारण खूप आहेत. नवीन गटातील लोकांना सामावून घ्यायच आहे. त्यामुळे राणेंना काढायचं सुरू आहे. असं मी ऐकलं आहे. पीएमओकडे आमची ही माणस आहेत. आम्हालाही माहिती मिळते मला त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडू नका. असं राऊत यांनी यावेळी खडसावल आहे.

माझ्या आयुष्यात मी पक्ष सोडल्यावर राणेंना भेटलो नाही. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा झाली अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली आहे.

Share This News
error: Content is protected !!