नंदुरबार : अत्याचार पीडित महिलेची आत्महत्या ? पालकांची न्यायासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे धाव

343 0

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एका विवाहितेवर काही लोकांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेचा अकस्मात मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याने केवळ याच दृष्टीने तिचे शवविच्छेदन केले. मात्र सदर महिलेवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आले असून तिच्या मृतदेहाचे पुन्हा एकदा चांगल्या महिला डॉक्टरांकडून शवविच्छेदन व्हावे अशी मागणी आज या महिलेच्या पालकांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील यांच्याशी डॉ. गोऱ्हे यांनी त्वरित संवाद साधत याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. श्री. पाटील यांनी पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात येईल असे सांगितले आहे.

या संपूर्ण घटनेत मागील दीड महिन्यापासून हलगर्जीपणा करणाऱ्या आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना निलंबनाची कारवाई करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!