नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत ‘या’ बड्या नेत्याचे नाव , वाचा सविस्तर

314 0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्ष निवडीसाठी २० वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे .या निवडणुकीमध्ये सोनिया गांधी ,राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे इच्छुक नसल्याकारणाने कोणता नेता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरतो याविषयी उत्सुकता होतीच. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा जोरदार पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं होतं. सोनिया गांधी यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यानंतर पक्षाचं काम पाहत आहेत.

See the source image

दरम्यान केरळचे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीच्या शर्यतीमध्ये शशी थरूर यांचे नाव स्पष्ट झाले आहे.

See the source image

शशी थरुर यांच्यापुढं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत याचं कडवं आव्हान असण्याची शक्यता आहे. शशी थरुर यांनी त्यांचे प्रतिनिधी मधुसूदन मिस्त्री यांच्यातर्फे उमेदवारी अर्ज मागवला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अशोक गेहलोत, मध्यप्रदेशातील माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मनीष तिवारी यांचं नाव देखील चर्चेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!