Chandrayaan 3

Chandrayaan 3 : चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी इस्लामिक सेंटरमध्ये मुलांनी केले नमाज पठण

1074 0

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान-3 ( Chandrayaan-3 ) आता अंतिम टप्प्यात आहे. जुलै महिन्यात चांद्रयान अवकाशात पाठवलं होतं. त्यानंतर आता चांद्रयानावरच सर्वांच्या नजरा खिळल्याचं पहायला मिळतंय. अवघ्या काही तासात आता चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणार आहे. इस्त्रो सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याने मोहिमेला यश मिळण्याची शक्यता आहे.

अशातच आता चांद्रयान-3 साठी देशभरातून प्रार्थना होत असल्याचं पहायला मिळतंय.कोणी मंदिरात देवाला नारळ फोडून प्रार्थना करत आहे, तर कोणी नमाज पठण करताना दिसत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे.इस्लामिक सेंटर मदरशात मुलांनी नमाज पठण केलं, तसेच चांद्रयानाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी प्रार्थना देखील केली आहे. सध्या त्यांच्या या नमाज पठणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!