हिवाळी अधिवेशनाला नागपूरचे वातावरण तापले ! पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धरले धारेवर; जोरदार घोषणाबाजी, वाचा सविस्तर

390 0

नागपूर : आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे. परंतु पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलं धारेवर धरल आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, आज महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पन्नास खोके, एकदा ओके ! फडणवीस सरकार हाय हाय, कर्नाटक सरकार हाय हाय…! बोम्मई सरकार समोर झुकलेल्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो… अशी घोषणाबाजी करण्यात आली.

नागपुरात आज हिवाळी अधिवेशनाला विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून जोरदार आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, विदर्भाला न्याय, धानाला भाव मिळाला पाहिजे. महापुरुषांचा सतत होणार अपमान बंद झाला पाहिजे या मागण्यांसाठी आज महाविकास आघाडी आणि घटक पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये अजित पवार, अंबादास दानवे, काँग्रेस येथे अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड धनंजय मुंडे, शिवसेना नेत्या मनीषा कायंदे आदि उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!