समृद्धी महामार्गावर नागपूर-शिर्डी बससेवा आजपासून सुरू; तिकीट दर जाणून घ्या

474 0

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. यानंतर आजपासून नागपूर ते शिर्डी जाणाऱ्या साई भक्तांसाठी स्लीपर कोच बससेवा सुरू करण्यात आली आहे. तिकीट दर आणि बसचं वेळापत्रक कसं आहे जाणून घेऊया.

ही विशेष बस नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक येथून दररोज रात्री नऊ वाजता निघणार असून पहाटे साडेपाच वाजता शिर्डी येथे पोहोचणार आहे. तसेच शिर्डी येथूनही बस रात्री नऊ वाजता निघून पहाटे साडेपाच वाजता नागपुरात दाखल होणार आहे. या बससेवेसाठी प्रति व्यक्ति 1300 रुपयांचे तिकीटदर ठरवण्यात आले असून लहान मुलांसाठी 670 इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलतही या बसमध्ये लागू असणार आहे. याशिवाय 65 वर्षांवरील ज्येष्ठांना तिकीट दरात 50 टक्के सवलतही लागू असणार आहे.

Share This News
error: Content is protected !!