कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर आणि घरावर इडी आणि आयकर विभागाने धाड टाकली होती. यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, ” माझ्या घरावर तीन वेळा छापा टाकण्यात आला. यावेळी काही मिळाले नाही, आताही छापा पडणार याची माहिती चार दिवस आधीच मिळाली होती. छापा टाकणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचा काही दोष नाही. यामागे कोण यात जाऊन कोणाला डिवचून काही वाद करायचा नाही. ” असे ते म्हणाले.
धाडीचे सत्र झाल्यानंतर भाजपने ते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये जाण्याची घोषणा केली होती. यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, सोमय्या कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कार्यकर्ते अडवणार नाहीत. कोल्हापुरात येऊन कामाची माहिती घ्यावी. माझे काम हे खुली किताब आहे. त्यांनी जरूर कोल्हापुरात यावं आणि दर्शन घेऊन जावं असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांना दिला आहे.