पुणे : मुरलीधर मोहोळ यांची भाजपच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती

353 0

पुणे : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भाऱतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्यातील राजकारणात भाजपाचे महत्वाचे नेतृत्व असलेल्या मोहोळ यांच्याकडे नेत्यांचे दौरे आणि सभांचे नियोजन सोपविणे हे आश्‍यर्य व्यक्त करण्याचे कारण मानले जात आहे.

नव्या प्रदेशाध्यक्षांनी नव्या नेमणुका केल्या आहेत.या नेमणुकांमध्ये मोहोळ यांच्या नेमणुकीचा समावेश आहे. भाजपाच्या संघटनात्मक रचनेत विविध समित्या असतात. त्यापैकी केंद्रीय नेता प्रवास योजना समिती आहे. केंद्रीय नेत्यांचा संबंधित राज्यातील प्रवास, सभा आणि संपूर्ण दौऱ्याच्या समन्वयाची जबाबदारी संयोजक तसेच सहसंयोजकांकडे असते.

येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषदा व लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. मोहोळ हे पुणे लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडेच प्रवास योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे हे आश्‍यर्य वाटण्याचे कारण मानले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!