#MURDER : सामायिक विहिरीतील पाण्यावरून जुंपली; भावकीतील कुटुंबाने काका पुतण्याला दिला असा भयानक अंत

3318 0

सांगली : सांगलीतील जत तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामायिक विहिरीच्या पाण्यावरून दोन कुटुंबामध्ये जबरदस्त वाद झाला. यानंतर भावकीतील कुटुंबाने काका पुतण्याला तलवार आणि कुऱ्हाडीने वार करून संपवल आहे.

यामध्ये विलास यमगर वय 45 आणि प्रशांत यमगर वय 23 या दोघांची निर्दयपणे हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतीतील 4 गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पातळीवरून भावकीत वाद सुरू होता.

शनिवारी सकाळी झालेला हा वाद मोठ्या प्रमाणावर वाढला आणि त्यातूनच 12 हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार ,चाकू, कुऱ्हाड अशा हत्यारांनी भयावह हल्ला चढवला. यामध्ये काका पुतण्या ठार झाले असून अन्य चौघांवर उपचार सुरू आहेत.

Share This News
error: Content is protected !!