#MURDER : पतीने रस्त्याच्या मधोमध पत्नीवर चाकूने केले ७ वार ; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

1104 0

तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पत्नीवर चाकूने वार करून तिची हत्या केली. घटनेनंतर आरोपी पसार झाला. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीकॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ही धक्कादायक घटना वेल्लोरच्या पेरियावरिगाम भागातील आहे. हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पती आपल्या पत्नीवर चाकूने अनेक वार करताना दिसत आहे. या काळात लोक तिथून जात आहेत, पण महिलेला वाचवण्याचे धाडस कोणीही केलेले नाही. आरोपी पती चाकूने महिलेवर सात वार करून पळून जातो. गंभीर जखमी झालेली महिला रस्त्यावर पडते आणि मग लोकांची गर्दी जमते.

घरी परतत असताना हल्ला

पुनीता असे मृत महिलेचे नाव आहे. पुनीता एका खासगी शू कंपनीत कामाला होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुनीता सोमवारी रात्री कंपनीतून घरी परतत होती. त्यानंतर तिचा पती जयशंकर तेथे आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला.

पत्नीवर केले सात वार

हल्ल्यापूर्वी पुनीता आणि जयशंकर यांच्यात वादही झाला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जयशंकर यांनी पत्नीवर चाकूने सात वार केले. जयशंकर गेल्यानंतर काही लोकांनी पुनीतला सरकारी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पुनिताचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!