जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत भाऊ झाला वैरी, बारामती येथील थरारक घटना

14369 0

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाचा शेतातच दगडाने ठेचून खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील सांगवी या गावात घडली. खून करुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या अर्ध्या तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याबरोबर त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद हिराचंद फडतरे असे खून झालेल्या भावाचे नाव आहे तर विशाल गणपत फडतरे असे आरोपीचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, काकासाहेब हिराचंद फडतरे व त्यांचे चुलते गणपत कृष्णा फडतरे ( रा.सांगवी ता.बारामती) यांच्यात जुना सांगवी -पणदरे रोड येथील वडिलोपार्जित शेती गट नं. ४०१ वरून वाद आहे. याबाबत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता काकासाहेब फडतरे व त्याचा भाऊ विनोद हिराचंद फडतरे हे दोघे मोटारसायकल वरून शेतातील नांगरणी पहाण्यासाठी गेले होते. पहाणी करुन विनोद घरी जाण्यासाठी निघाला.

यावेळी आरोपी विशाल गणपत फडतरे शेतात पाळत ठेवून होता. विनोद येताच त्याने विनोदला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी विशालने विनोदच्या डोक्यात दगड मारला. ते दोघे मारामारी करीत रस्त्यावर आले. यावेळी पुन्हा विशालने विनोदच्या डोक्यात मोठा दगड मारला. डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने तो रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला. त्यानंतर विशाल घटनास्थळावरून फरार झाला.

गावामध्ये बातमी कळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली. मात्र गंभीर जखमी झाल्याने विनोदच मृत्यू झाला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत पळून जाण्याच्या तयारीत आलेल्या विशालला ताब्यात घेऊन खुनाच्या आरोपाखाली अटक केली. तसेच इतर दोन जणांवर खुनासाठी फूस दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!