मुंबई पुन्हा हादरली : पंधरा वर्षीय मुलीवर मित्रासह पाच जणांनी केला सामूहिक बलात्कार; तीन आरोपी अल्पवयीन

840 0

मुंबई : मुंबईच्या लोअर परेल भागामध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचा मित्र तिला त्याच्या एका मित्राच्या घरी घेऊन गेला होता. तिथेच पीडितेच्या मित्राच्या आणखी पाच मित्रांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे यातील तीन आरोपी हे देखील अल्पवयीन आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

यातील तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी डोंगरी भागातील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून आरोपींना कठोर शिक्षा होईल असा विश्वास मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!