Mumbai Pune Highway

Mumbai Pune Expressway: मुंबई-एक्स्प्रेस वे आज 1 तास राहणार बंद; कसे असेल ट्रॅफिकचे नियोजन?

639 0

पुणे : मुंबई- पुणे प्रवास (Mumbai Pune Expressway) करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 8 नोव्हेंबर रोजी द्रुतगती मार्गावर 1 तासाचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक दोन्ही दिशांना वेगवेगळ्या वेळी 30 मिनिटांसाठी असणार आहे. जर तुम्ही आज या एक्सप्रेसवेवरुन प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुच्याचसाठी आहे.

एक्स्प्रेस वे हा मुंबई आणि पुणे दरम्यानचा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावरून लाखो प्रवासी प्रवास करतात. मुंबईहून पुण्याला दररोज मोठ्या संख्येने लोक ये-जा करतात. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ढेकू गावाजवळ वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (TMS) उपकरणे बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या काळात पुणे ते मुंबई हा महामार्ग दुपारी 2 ते 2.30 यादरम्यान बंद राहणार आहे अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे. तसेच मुंबई ते पुणे हा महामार्ग दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुपारी 3 नंतर महामार्ग पुन्हा वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे.

या गॅन्ट्री बसवताना, पुणे वाहिनीवरील सर्व वाहतूक खालापूर टोल नाका तसेच शोल्डर लेनवर पूर्णपणे बंद असणार आहे. फक्त कारसाठी खोपोली एक्झिटपासून जुना हायवे शिंगरोबा घाट ते मॅजिक पॉइंट एक्स्प्रेस वेकडे वळवला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी हा मार्ग टाळण्याचा सल्ला एमएसआरडीसीकडून देण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!