मुंबई : बीकेसी मैदानावर कार्यक्रमाला सुरुवात ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा; म्हणाले ” काही लोकांनी बेईमानी केली…!”

1046 0

मुंबई : मुंबईत 38 हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत बीकेसी मैदानावर उपस्थित आहेत. कार्यक्रमाला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात झाली. सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत आले आहेत. भाषणामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही 2019 मध्ये सांगितलं होतं की पाच वर्षाच्या डबल इंजिन सरकार आणा. आपल्यावर विश्वास ठेवून देशातील नागरिकांनी डबल इंजिनचं सरकार आणलं. पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनाचं सरकार नाही बनू शकलं. पण बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातलं सरकार इथे तयार झालं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!