“मुंबई महाराष्ट्राची कोणाच्या बापाची नाही !” कर्नाटक मंत्र्याच्या ‘त्या’ संतापजनक वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

352 0

नागपूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर रोज आगीत तेल कोणी ना कोणी होतच आहे. आता कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वत नारायण यांनी मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी केली त्यांच्या या संताप जनक वक्तव्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले आहेत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांच्या वक्तव्याचा विधानसभेत निषेध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली; अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल

मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही. कर्नाटक उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांच्या या वक्तव्याची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार, असे देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मुंबईवर जर कोणी दावा सांगत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत जे ठरल आहे. त्याच उल्लंघन वारंवार कर्नाटक सरकारकडून होत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करत असून आम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहीत याचा निषेध करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देणार आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. कोणाच्या बापाची नाही अशी परखड भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!