मुंबई : तुम्हीही लग्नाचा वाढदिवस विसरता का ? ही बातमी वाचा, लग्नाच्या वाढदिवस विसरला म्हणून नवरा बायको मध्ये रप्पाधप्पी

785 0

मुंबई : ऐकावं तेवढं नवलच अशी एक घटना घडली आहे. आत्तापर्यंत लग्नाचा वाढदिवस विसरला म्हणून नवरा बायको मध्ये भांडण, नाराजी वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल, पण एक अजबच किस्सा आता घाटकोपर मधून ऐकिवात येतो आहे. तर झालं असं की, मुंबईतील घाटकोपर मध्ये 18 फेब्रुवारीला एका जोडप्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. 2018 मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं.

दरम्यान नेमका 18 फेब्रुवारीला नवरा लग्नाचा वाढदिवस विसरला, पण केवळ नाराजी किंवा भांडणावर त्यांचे वादविवाद थांबले नाहीत. तर संतापलेल्या बायकोने थेट तिच्या आई-वडिलांना आणि भावाला सासरी बोलावून घेतलं. आणि पती आणि सासूला मारहाण केली. तसंच घरातल्या वाहनाच देखील नुकसान केले.

या प्रकरणी घाटकोपर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांनी सांगितलं की, या चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!