मुंबई : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा घेतला आढावा

155 0

मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दादर येथील महापौर बंगल्याच्या आवारात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बाळासाहेबांच्या स्मारकाची रूपरेषा जाणून घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत या कामाची पाहणी केली.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची ओळख करून देणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे कंगोरे या स्मारकाद्वारे जनतेसमोर मांडले जाणार आहेत. त्यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कर्तृत्व, व्यंगचित्रकार, पत्रकार, वक्ते आणि एक व्यक्ती म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे अत्यंत कल्पकपणे या स्मारकातून मांडले जाणार आहेत. या स्मारकाचे स्थापत्य काम सध्या प्रगतीपथावर असून त्यात ठेवल्या जाणाऱ्या वस्तू आणि माहिती जमा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नियोजित वेळेआधी हे काम पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य असल्याचे यासमयी बोलताना स्पष्ट केले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, माजी मंत्री रामदास कदम, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवास हेदेखील उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!