Mumbai City

‘मुंबई’ ठरलं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर

934 0

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपलं मुंबई शहर (Mumbai City) जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं प्रमाणिक शहर (Honest City) ठरलं आहे. जगातल्या काही मोठमोठ्या शहरांमधील नागरिकांचा प्रमाणिकपणा पडताळण्यासाठी अमेरिकेतील (America) प्रसिद्ध मासिक ‘रीडर्स डायजेस्ट’ने (Reader’s Digest) एक भन्नाट सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये जगभारतून मुंबई दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर असल्याचे समोर आले आहे.

रीडर्स डायजेस्ट या मासिकाने 16 शहरांमध्ये पैशाने भरलेले 192 पाकीटे सोडले. या सर्व्हेक्षणामध्ये प्रत्येक शहरामध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी पैशांनी भरलेली 12 पाकिटे ठेवण्यात आली. या पाकिटामध्ये एका व्यक्तीचे नाव,पत्ता, मोबाइल क्रमांक, कुटुंबाचे छायाचित्र, कूपन, व्यावसायिक कार्ड, स्थानिक चलनानुसार 50 डॉलर म्हणजेच 3 हजार 600 रुपये ठेवण्यात आले. यानंतर कोणत्या शहरामधून किती पाकिटे परत आली याचा तपास करण्यात आला.

हेलसिंकीमधील नागरिकांनी पैसे असलेली 11 पाकिटे परत आणून दिली.. आणि यानंतर यामध्ये मुंबईकरांनी बाजी मारत 12 पैकी नऊ पाकिटे परत आणून दिली. यामुळे मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर ठरले आहे. मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना हा सर्वे मुंबईकरांना दिलासा देणारा आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!