खासदार संजय राऊतांच्या अडचणी वाढ ! विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाणार

619 0

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ‘विधीमंडळ नाही चोरमंडळ आहे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी आज कोल्हापूरमध्ये केलंय. या वक्तव्यामुळे विधिमंडळामध्ये गदारोळ सुरु आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी घडत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाणार आहे.

अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आजच होणार आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाचे 10, तर विरोधी पक्षाचे 5 सदस्य असणार आहेत.तर हक्कभंग समितीचे अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवडीची शक्यता आहे. समितीकडून संजय राऊतांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या 48 तासांच उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती समजते आहे.

Share This News
error: Content is protected !!