NET, SET, PHD धारक संघर्ष समितीचे प्राध्यापक भरतीसाठीचे आंदोलन; बुद्धिवंतांची मुस्कटदाबी करू नका; आंदोलनकर्त्यांचा निर्वाणीचा इशारा…

427 0

पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद असून त्यामुळे नेट सेट पीएचडी या उच्च पदव्या घेऊन बेरोजगारीत दिवस कंठीत असणाऱ्या तरुणांची सहनशीलता संपली आहे; दरम्यान, सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी राज्यभरात आंदोलन पुकारले असून आज पासून (दि.27)पुणे उच्च शिक्षण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाने सुरुवात झाली आहे.

नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समिती ऐन दिवाळीत रस्त्यावर आली आहे.नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने ऐन दिवाळीत उच्च शिक्षण संचालनालय पुणे यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन ०३ व संघर्ष पदयात्रा दि. २७ ते २९ ऑक्टोबर 2022 पुकारलेले आहे.
संघर्ष समितीच्या सदस्यांनी पुढील मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.
१) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १००% सहायक प्राध्यापक भरती झाली पाहिजे.
२) वेठबिगारीचा पुरस्कार करणारे तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन मिळाले पाहिजे.
३) सुरू असलेली प्राध्यापक भरती (२०८८) गतीमान करून पुढील १००% सहायक प्राध्यापक भरती सुरू करावी.
४) विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नेमणूक करावी.

वरील मागण्यांसाठी समितीचे सदस्य व पदाधिकारी राज्यभरातून पुण्यामध्ये दाखल होत आहेत. शासनाने लवकरात लवकर समितीच्या मागण्या मान्य करून पात्रताधारकांना न्याय मिळवून द्यावा.ही मागणी पात्रताधारक प्राध्यापकांनी केली आहे.

आजपर्यंत अनेक आंदोलने झाली त्यातील हे राज्यव्यापी तिसरे आंदोलन आहे. आश्वासनावर या उच्चशिक्षित बेरोजगारांची केवळ बोळवण करण्यात आली. दैनंदिन जीवनाचा गाडा चालवणे अशक्य झाल्याने लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

शासनाने लवकरात लवकर वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती करून या उच्चशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!