जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोटारसायकल फेरी व राष्ट्री युवा दिन व्याख्यानमालेचे आयोजन

610 0

पुणे : जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल फेरीचे व राष्ट्रीय युवक दिन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

मोटार सायकल फेरीचे शनिवारवाडा येथून शुभारंभ करण्यात आला. या मोटारसायकल फेरीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील २ हजार विद्यार्थी व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-२० विषयक जनजागृती करण्याकरीता राष्ट्रीय युवा दिन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरु डॉ. कारभारी काळे व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. ढाकणे यांनी जी-२० परिषदेत युवकांची भूमिका, संधी व आव्हाने याबाबत युवकांना मार्गदर्शन केले.

Share This News
error: Content is protected !!