मोक्का @100 ! पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मोक्का अंतर्गत कारवाईचे शतक

579 0

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. दरम्यान सायबर चोरट्यांच्या विरुद्ध करण्यात आलेली मोक्कांतर्गत ही पहिलीच कारवाई आहे. लोन ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घेण्यास भाग पाडून लुटणाऱ्या टोळक्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.

टोळीप्रमुख धीरज भारत पुणेकर याचे आंतरराष्ट्रीय टोळीशी देखील संबंध असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. यासह स्वप्निल नागटिळक, श्रीकृष्ण गायकवाड, प्रमोद रणसिंग, सॅम्युअल कुमार, सय्यद पाशा, मुबारक बॅग मुजीबरांद कंदील पिता इब्राहिम, मोहम्मद मणियात पिता मोहिदु यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.

पुणे शहरातील टोळक्यानविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करून शतक गाठले आहे. शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी ,नागरिकांना सुरक्षित भावनेने शहरात राहता यावे. या उद्देशाने कारवाईचा बडगा उगारून पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.

Share This News
error: Content is protected !!