Breaking News

… अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करू, वसंत मोरे यांनी कुणाला दिला इशारा ?

815 0

‘आमचे साहेब परप्रांतीयांविषयी बरोबरच बोलतात. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सगळ्या परप्रांतीयांचं नाव खराब करतात. म्हणून आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागते. यापुढे कोणताही माणूस कंपनीमध्ये काम करण्यासाठी घेताना पूर्ण चाळूनच तुम्हाला घ्यावा लागेल. अन्यथा आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करायला आताही कमी करणार नाही. असा इशारा मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे यांनी दिला आहे.

पुणे शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आणि पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. हे प्रकरण घडल्यानंतर वसंत मोरे यांनी अनेकदा आरोपींची माहिती कंपनीकडे मागितली होती. मात्र कंपनीने उडवाउडवीचे उत्तर देऊन, टाळाटाळ केली होती. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाहिजे असलेली माहिती मोरे यांना पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर मोरे यांनी थेट कंपनीमध्ये जाऊन संबंधित मॅनेजर व कर्मचारी यांना जाब विचारला.

परप्रांतीय नागरिकांना कामाला ठेवण्यापूर्वी त्यांची पूर्ण माहिती करून घेतली होती का? त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं का? असे प्रश्न मोरेंनी विचारले. सिक्युरिटीने कंपनीच्या गेटवरुन पीडित मुलीच्या आई-वडिलांना हाकलून दिलं होतं. हा सगळा प्रकार माझ्या भागात घडला आहे. म्हणून योग्य तो न्याय त्यांच्या कुटुंबियांना द्यावा नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू. जिथे गरज पडेल तिथे दांडा नक्की बाहेर काढू, असा इशारा मोरेंनी दिला आहे.

काय घडली होती घटना ?

तुझ्या मित्राचं लग्न आहे, त्याने तुला लग्नाला बोलावलं आहे, अशी फूस लावून एका ४० वर्षीय महिलेने १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशला नेले. तिचा ५० हजारात सौदा करुन एका अनोळखी व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं. हा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. हा सगळा प्रकार पुण्यातल्या एका कंपनीत घडला, जिथे पीडित मुलगी तिच्या बहिणीला शाळेत जाताना डब्बा देत असायची, त्याच कंपनीत आरोपी महिलाही काम करत होती.

तिने पीडित मुलीशी ओळख करून विश्वास संपादन केला आणि मित्राचं लग्न आहे, म्हणून मध्य प्रदेशला घेऊन गेली. आरोपी महिलेचा एका तरुणासोबत लग्नासाठी मुलगी पाहिजे म्हणून ५० हजारांचा सौदा झाला होता, त्यानंतर पीडितेचं लग्न एका अनोळखी मुलाशी लावून दिलं. हा प्रकार जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालावधीत घडला, दोन महिने मुलगी तिथे राहिली होती, या दरम्यान मुलीला दमदाटी व धमकी देऊन मुलाला सोबत राहण्यास भाग पाडलं होतं, पोलिसांनी या घटनेचा तपास करत दोन महिन्यात छडा लावला. मुलीला सुखरूप कुटुंबीयांकडे स्वाधीन केलं आणि आरोपींना अटक केली.

Share This News
error: Content is protected !!