आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे पोहोचल्या थेट नागपूर अधिवेशनात

278 0

नागपूर : आज पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये आरोप प्रत्यारोप होतील, आंदोलने होतील. पण आजच्या पहिल्या दिवशी एका कौतुकास्पद घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतल आहे. आमदार सरोज अहिरे या आज हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन पोहोचल्या आहेत. यावेळी माध्यमांनी आमदार सरोज अहिरे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “मी आमदार आहे आणि आता आई ही झाले, त्यामुळे दोन्हीही कर्तव्य बजावणं माझं काम आहे.

नाशिक जिल्ह्यातील देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे आज आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनात पोहोचल्या. एक आई म्हणून बाळाची काळजी घेते तर आमदार म्हणून मतदारांना न्याय मिळावा म्हणून अधिवेशनात सहभागी व्हायला आले आहे. विधान भवन परिसरात फीडिंग रूम आणि हिरकणी कक्ष व्हावा अशी मागणी या सरोज अहिरे यांनी केली.

आज एक आई म्हणून आणि एक आमदार म्हणून त्या थेट हिवाळी अधिवेशनामध्ये पोहोचल्या. आपल्या इवल्याश्या बाळाला सोबत घेऊन त्यांनी जेव्हा विधानभवनामध्ये पाय ठेवला तेव्हा नक्कीच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बाळाचे कर्तव्य हे केवळ आईचे जरी नसले तरी तान्हुल्या बाळासाठी आई ही सर्वात महत्त्वाची असते. अशावेळी अनेक जणी ही तारेवरची कसरत करताना थकून जातात. आमदार सरोज अहिरे यांचे आजचे हे काम पाहून नक्कीच या नवमातांनी आदर्श घेण्यासाठी ही बातमी आहे.

Share This News
error: Content is protected !!