MIT World Peace University : १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ

317 0

पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस चालणार्‍या १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. स्वामी विवेकानंद सभामंडप एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पस, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.

या समारंभासाठी भारत सरकारच्या कायदा आणि न्याय राज्यमंत्री एस.पी. सिंह बघेल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, बिहारचे विरोधी पक्ष नेते व माजी सभापती विजय कुमार सिन्हा,इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन, हरित कार्यकर्ता आणि हिमालयन पर्यावरण अभ्यासक आणि संवर्धन संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ आणि आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अनंत सिंघानिया व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच, सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी http://www.bhartiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी असे आवाहन आयोजनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!