मिशन शक्ती : महिलांनो ‘हा’ नं. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असायलाच हवा; संकट काळात मिळणार तत्परतेने मदत, वाचा हि बातमी

787 0

महाराष्ट्र : राज्यातील महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने ‘१८१’ हा नवा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आणला आहे. वर्षातील बाराही महिने आणि २४ तास हा क्रमांक फक्त महिलांसाठी कार्यरत असेल. हुंडा बळी असो किंवा बालविवाह कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी महिलांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या शिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती ही या क्रमांकावरून महिलांना मिळवता येईल.

पंतप्रधानांच्या ‘मिशन शक्ती’ या योजनेअंतर्गत हा क्रमांक सुरू करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात तो महिलांसाठी कार्यरत होईल, अशी माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!