मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; इन्स्टा पोस्ट करून म्हणाली, ‘माझं हृदय…!’

865 0

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर एन्जिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे.

याबाबत स्वतः सुष्मिता सेन हीने आपल्या इन्स्टा अकाउंट वरून माहिती दिली आहे. यावेळी तिने लिहिला आहे की, “आपल्या हृदयाची काळजी घ्या. तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुमचं हृदय तुमची साथ देणार आहे. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर एनजीओप्लास्टी ही करण्यात आली. स्टेट टाकण्यात आले आहेत. आता माझं हृदय सुरक्षित आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे कार्डिओलॉजिस्टने हे कन्फर्म केलं आहे की माझं हृदय खरंच खूप मोठं आहे.

सुष्मिता सेन विषयी ही माहिती ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सुश्मिता 47 वर्षांची एक सुंदर अभिनेत्री आहे. पण इतक्या कमी वयात तिच्याबद्दल ही बातमी ऐकून तिच्या चहात्यांना धक्का बसला आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून तिचे फिटनेसचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. सुश्मिताने आपल्या अकाउंट वरून ही माहिती दिल्यानंतर तिच्या चहात्यांनी आणि बॉलीवूड मधील अनेकांनी ती लवकरात लवकर बरी व्हावी अशा तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!