#BOLLYWOOD : मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1449 0

मुंबई : सिनेविश्वातून पुन्हा एकदा वाईट बातमी समोर येत आहे. मिर्झापूरचे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी शाहनवाज प्रधान यांनी अखेरचा श्वास घेतला.

शाहनवाज प्रधान एका पुरस्कार समारंभात सहभागी झाले होते, जिथे त्यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. शाहनवाजच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून चाहते आणि स्टार्स सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

शाहनवाज प्रधान यांच्यावर १८ फेब्रुवारीला अंत्यसंस्कार करण्यात आले. शाहनवाज प्रधान एका पुरस्कार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांना छातीत तीव्र वेदना झाल्या आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील अंधेरी येथील ‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी’ येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या कार्यक्रमाला इतरही अनेक स्टार्स सहभागी झाले होते.

Share This News
error: Content is protected !!