Nitin Gadkari And Truck

Nitin Gadkari : ट्रकचालकांसाठी नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

650 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील ट्रक चालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशातील ट्रक चालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे. नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) हा नियम लागू करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

Darshana Pawar Murder Case : प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी आहे, पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा….दर्शना पवार शेवटच्या भाषणात म्हणाली…

काय म्हणाले नितीन गडकरी?
एका कार्यक्रमातबोलतांना गडकरी यांनी सांगितले की या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी मी संबंधित फाईलवर स्वारक्ष केली आहे. मी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हापासून ट्रकच्या केबिनमध्ये एसी बंधनकारक करण्याची इच्छा होती. मात्र उत्पादनाचा खर्च वाढेल याबाबत कंपन्यांची तक्रार होती. लांबच्या प्रवासादरम्यान ट्रकचालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम कमी करणं आणि अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलाय असे गडकरी यांनी म्हटले आहे.

Adipurush Movie : आदिपुरुष सिनेमावर बंदी आणा, शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराने केली मागणी

ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळणार
नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या या निर्णयानंतर भर उन्हात उष्णतेचा मारा सहन करत 12 ते 14 तास ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वॉल्व्हो सारख्या ट्रक उत्पादक जागतिक कंपन्या आधीपासून आपल्या ट्रकमध्ये एसी केबिन उपलब्ध करून देतात. आता भारतातील कंपन्यांनाही 2025 पासून प्रत्येक ट्रकमध्ये एसी केबिन देणं बंधनकारक होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!