Gulabrao Patil Mother

Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आईचे निधन

1708 0

जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे पाळधी इथल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. रेवाबाई पाटील यांच्या पार्थिवावर पाळधी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमारास राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

Share This News
error: Content is protected !!