मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ; मुलीच्या टीईटी घोटाळा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

510 0

बारामती : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता दिसून येते आहे. विरोधी पक्षाकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. तर त्यांच्या मुलीच्या टीईटी घोटाळ्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वासोटा किल्ल्यावर जाण्याचा विचार करत आहात ? तर वनविभागाचा ‘हा’ निर्णय वाचा

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेल्या दाव्यानुसार टीईटी प्रमाणपत्र नसताना अब्दुल सत्तार यांच्या मुलीला सेवेत कायम कसे केले? असा सवाल नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे. हिना कौसर यांचे टीईटी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली असून, हिना यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जन्मतारखा असताना त्यांना सेवेत रुजू करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा : बांधकाम परवाने देणारी BPMS वेबसाईट ६ दिवसांपासून बंद

तर दुसऱ्या कन्येची माहिती उपलब्ध नसल्याने संबंधित विभागाचे पत्र नितीन यादव यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता एकंदरीतच एकीकडे जमीन घोटाळा प्रकरण आणि दुसरीकडे मुलीचा टीईटी प्रमाणपत्राबाबत असलेला घोटाळा पाहता शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होतानाच दिसते आहे.

Share This News
error: Content is protected !!