मानसिक आरोग्य : तुमचाही स्वभाव चिडचिडा झाला आहे? हे कारण असू शकतं, वेळेत करा आत्मपरीक्षण !

355 0

मानसिक आरोग्य : अनेक जणांचा स्वभाव हा चिडचिडा असतो असं आपण म्हणतो. पण ते सत्य नाही. पुष्कळ वेळा एखाद्या व्यक्तीच वागणं आवडत नाही म्हणून किंवा माझ्याच सोबत अशा घटना का होतात, या विचारांनी माणूस चिडचिडा होत जातो. त्या व्यतिरिक्त आरोग्याच्या देखील अशा अनेक समस्या असतात ज्यामुळे संतापात भर पडते. आरोग्याच्या तक्रारी पोट साफ न होणे डोकेदुखी अशा किरकोळ समस्यांपासून मोठे आजार जे शरीराला पिळवटून काढतात यामुळे देखील चिडचिडेपणा वाढतो. या संतापाचे अनेक वेळा नात्यांवर आणि अगदी करिअरवर देखील वाईट परिणाम पडण्याची शक्यता असते. पण तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे का की विनाकारण तुमची चिडचिड वाढते आहे.

आयुष्यात बराच वेळा अशा गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतला असेल की, विनाकारण कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्याचा किंवा कृतीचा तुम्हाला अचानक राग येतो आणि तुम्ही अगदी नाते तोडून टाकण्यापासून त्या व्यक्तीला अपशब्द देखील बोलून जाता. अशा वेळी आत्मपरीक्षण करणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

एखाद्या व्यक्तीचा राग दुसऱ्या व्यक्तीवर काढणे असे देखील आपण बऱ्याच वेळा करतो. अशा वेळी स्वतःला वेळ द्या, शांत बसून स्वतःच्या मनाला आपण कुठे चुकलो आहोत ? आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं आहे का ? किंवा एखादी अशी महत्त्वाची गोष्ट की जी तुम्हाला माहित आहे, तुमच्याकडून चुकीची घडली आहे. पण ते तुम्हाला मान्य करण्याचे धैर्य नसते… तर ते धैर्य तुम्हाला तुमचा आत्मपरीक्षण पुन्हा मिळवून देईल.

चूक मान्य करा ! कारण जे तुम्ही कृत्य तुमच्याकडून घडले आहे त्यामुळे समोरच्या व्यक्ती पेक्षा तुमच्या मनाला जास्त त्रास होत असतो. आपल्याकडून घडलेल्या चुकीच्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करतो आणि त्यामुळेच आपल्यातला चिडचिडेपणा बाहेर येतो.

Share This News
error: Content is protected !!