‘उत्तर भारतीय भवन’ साठी केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांना निवेदन

279 0

पुणे : पुण्यातील उत्तर भारतीयांची संख्या घेऊन त्यांच्या उपक्रमांसाठी ‘ उत्तर भारतीय भवन ‘ उभारावे , असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पुणे, पिंपरी -चिंचवड, सांगली जिल्हयाचे प्रभारी नवीन सिंह यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दिले. आज पुण्यात तोमर यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.

उत्तर भारतीयांच्या औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी ही वास्तू उपयुक्त ठरेल, त्यामुळे तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असे नवीन सिंह यांनी सांगितले. यावेळी नवीन सिंह यांनी श्री. तोमर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

Share This News
error: Content is protected !!