पिंपरी- महापालिका निवडणुकीचे वेध लागलेले असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. पिंपरी चिंचवडमधील थेरगाव भागाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी आज नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.
नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे ह्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे माया बारणे ह्यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपामधील भ्रष्टाचाराला कंटाळून राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी स्पष्ट केल आहे. यापूर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे, चंदा लोखंडे आणि तुषार कामठे यांनी राजीनामा दिला होता.
आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यामुळे अनेक नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच ओबीसी आरक्षाणाचा निर्णय या सगळ्यामुळे अनेक नेत्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे.