कोल्हापूर गोकुळ शिरगाव एमआयडीसीत भीषण आगीची घटना

510 0

कोल्हापूर : कोल्हापूर मधील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील सेराफ्लेक्स युनिटमध्ये ही आग लागली असल्याचे समजते आहे.

ही आग एवढी भीषण स्वरूपात लागली आहे की, आतापर्यंत ही संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी सापडली असल्याची माहिती समोर येते आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत तरी या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं समजलं असून कर्मचारी या आगीन रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच कंपनीच्या बाहेर पडले आहेत.

परिसरामध्ये ॲम्बुलन्स देखील दाखल झालया आहेत. या एमआयडीसीमध्ये बऱ्याच कंपन्या असून केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली असल्या कारणाने ही आग इतर कंपन्यांकडे पसरू नये यासाठी देखील काळजी घेतली जाते आहे.

Share This News
error: Content is protected !!