BIG NEWS : अहमदनगरच्या गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट; कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर केला निर्मनुष्य

550 0

अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.पाथर्डी, शेवगाव, पैठण आणि अहमदनगर येथून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब रवाना झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

गंगामाई कारखान्याच्या डिसलेरी विभागाला लागलेल्या आगेमध्ये कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही अशी अधिकृत माहिती कारखाना प्रशासनने दिली आहे. या घटनेत सर्व कामगार सुखरूप असून दोन ते तीन कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत. कोणीही दवाखान्यात दाखल झालेले नाही. या कारखान्यात जवळपास 35 कामगार काम करतात. मात्र पाच वाजता सुट्टी होत असल्याने अनेक कामगार बाहेर पडले होते अशी माहिती प्रशासनाकडून देण्यता आलेली आहे.

Share This News
error: Content is protected !!