“मराठी शाळा वाचल्याच पाहिजे !” पुण्यात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने चिकटवले पोस्टर

554 0

पुणे : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 100 एस.टी बसेसला पोस्टर चिकटवण्यात आले.

या वेळी ‘जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा’, ‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका’, ‘शिक्षणाचे खाजगीकरण बंद करा’, ‘मराठी शाळा वाचल्याच पाहिजे’, ‘शाळा बंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती’, असे पोस्टर लावण्यात आले.

याबाबत छात्रभारतीचे राज्य सदस्य तुकाराम डोईफोडे म्हणाले की, “राज्य शासनाने महाराष्ट्रातील 17000 कमी पटसंख्येच्या शाळा सरसकट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गोर-गरीब व शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर बंदी घालणारा आहे”.

या वेळी कार्यकर्त्यांनी पालक व विद्यार्थ्यांना या विषयाबाबत माहीती दिली. जिल्हाध्यक्ष छाया काविरे, सौरभ शिंपी, प्रफुल कांबळे, वैष्णवी कोळी, सकलेन सयद, सक्षम साळुंखे हे पदाधिकारी तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!