हॉटेलमध्ये कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत अख्खा मसूर ची भाजी तुम्ही नक्कीच ट्राय केली असेल पण आज तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कोल्हापुरी पद्धतीने अख्खा मसूरची भाजी कशी बनवता येईल ही रेसिपी सांगणार आहे.
चला तर मग पाहूयात साहित्य
एक वाटी अख्खा मसूर कमीत कमी पाच तास भिजवून घ्या किंवा रात्रीच भिजत घातला तर उत्तम
दोन मोठे बारीक चिरलेले कांदे
तेल जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, एक बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, मीठ आणि खायचा सोडा
चला तर मग पाहूयात रेसिपी
तर सर्वात पहिले भिजवलेला अख्खा मसूर कुकरला वाफायला ठेवा कुकरला अख्खा मसूर लावून तीन शिट्ट्या करून घ्या.
मसूर पटकन शिजतो शिट्ट्या होऊन कुकरचे झाकण पडेपर्यंत एका पातेल्यामध्ये कांदा काढून घ्या. यावर एक चमचा बेकिंग सोडा घाला आणि कांदा आणि बेकिंग सोडायचं मिश्रण चांगलं एकत्र करून घ्या. आणि हा कांदा आता गॅसवर शिजायला ठेवून द्या. बारीक गॅसवर हे मिश्रण शिजू द्या
कांदा शिजत असताना त्यावर एक ताट ठेवा आणि या ताटामध्ये पाणी घालून ठेवा. काही वेळाने कांद्याला चांगले पाणी सुटेल
कांद्याला ब्राऊन रंग आल्यानंतर गॅस बंद करा आता याच पातेल्यामध्ये कांद्यामध्ये वाफवलेला अख्खा मसूर ऍड करा आणि चांगले हलवून घ्या
आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्या आणि चांगली उकळी येऊ द्या.
आता एकीकडे एका पॅनमध्ये तेल गरम करायला घ्या. तेल तापल्यानंतर यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरची घालून मस्त फोडणी तडतडून घ्या. त्यानंतर यामध्ये लाल तिखट आणि चिरलेला टोमॅटो घालून चांगले हलवून घ्या. सामान्यपणे आपण भाज्यांसाठी जेवढं तेल घेत असतो त्यापेक्षा फोडणीसाठी दोन चमचे तरी तेल जास्त घ्या. आणि आता या मिश्रणामध्ये मसूर एकत्र करून घ्या.
संपूर्ण मिश्रण एकसारखे हलवून घ्या आणि अवघ्या एक ते दोन मिनिटांमध्ये चांगली उकळी आल्यानंतर बंद करा. तुमचा कोल्हापुरी स्टाईलने झणझणीत अख्खा मसूर तयार आहे. याला मस्त बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने गार्निश करा आणि सर्व्ह करा.