मुंबई : महाराष्ट्र हे कलाक्षेत्रातील (Marathi Film Association) अग्रगण्य राज्य आहे. चित्रपट क्षेत्रात लाखो कलाकार काम करतात. दरम्यान कलाकाराच्या हितासाठी काम करणाऱ्या काही संस्था कार्यरत असून यामध्ये आता नव्याने मराठी चित्रपट असोसिएशन भर पडली आहे. असोसिएशनच्या पहिल्याच बैठकीत सर्व संचालक मंडळाने एक मताने महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर मुंबई अध्यक्षपदी चंद्रकांत विसपुते यांची नियुक्ती केली आहे. मराठी चित्रपट असोसिएशनच्या पुढील वाटचालीतल्या अत्यंत महत्त्वाच्या काही ठळक विषय यानिमित्त चर्चेत आले आहेत.मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस यावे याकरिता मराठी चित्रपट असोसिएशन सतत कार्यरत असेल चित्रपट निर्मात्यापासून तंत्रज्ञ पर्यंत आणि तंत्रज्ञापासून तर बॅकस्टेज आर्टिस्ट पर्यंत या सर्वांसाठी सातत्याने मराठी चित्रपट असोसिएशन कार्यरत असणार आहे.
या पहिल्या बैठकीत काही मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले गेले आहेत त्याबद्दल वरती मराठी चित्रपट असोसिएशन काम करणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने,मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा (इंडस्ट्रियल) दर्जा देऊन त्याचं लेबर ऑफिसचे कार्यालय बनवावे आणि त्या ठिकाणी त्याच्या अंतर्गत युनियनचे रजिस्ट्रेशन करून युनियन च्या मार्फत सिने कलाकार व तंत्रज्ञ आणि त्या संदर्भातील सर्व कामगारचे प्रश्न सोडवावे.सिंगल चित्रपटगृह बाबतीत ज्या काही जाचक अटी शासनाने लावलेल्या आहेत, त्या अति शिथिल करून नव्याने त्या चित्रपट गृह मालकांना नवीन उद्योग व व्यवसाय चालू करण्याबाबत परवानग्या द्याव्यात.महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. तसेच स्व. विठाबाई नारायणगावकर यांचे स्मारक जुन्नर येथील नारायणगाव येथे उभे करण्यात यावे.मुंबई, पुणे येथे कलाकार मोठ्या प्रमाणावर शुटींगसाठी येत असतात, त्यांच्या साठी कलाकार भवन उभे करण्यात यावे.ज्याप्रमाणे तमाशा कलावंतांच्या बॅनर ला व्यावसायिक लेवल वर अनुदान शासनाकडून मिळलं जातं तसं गावोगावी जाऊन यात्रा जत्रा करणारे व्यावसायिक लावणी सादर करणारे बॅनर रेग्युलर कार्यरत आहेत अशा बॅनर्सला सुद्धा शासनाकडून अनुदान मिळावे.
महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलावंतांच्या पेन्शनसाठी 48 हजार रुपयेचा असलेला दाखल्याची अट बदलून ती एक लाख रुपये उत्पन्नाचा दाखला करावी. ITI मार्फत नाट्य, चित्रपट उद्योगास आवश्यक असणारे बॅकस्टेज आर्टिस्ट यांचे प्रशिक्षण सुरु करून त्यांना कुशल कामगार म्हणून मान्यता देण्या यावे.महाराष्ट्र शासनाकडून वृद्ध कलावंतांना जी पेन्शन मिळते त्या पेन्शनमध्ये वाढ करावी. मराठी चित्रपट अनुदानाची रक्कम वाढवण्यात यावी ज्याप्रमाणे अ,ब, दर्जा आहे. त्याचप्रमाणे क दर्जा सुरू करून किमान निर्मात्याच्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एक सानुग्रह अनुदानाची व्यवस्था करण्यात यावी. ज्यामुळे चित्रपट निर्मात्याला पहिल्यांदा चित्रपट निर्मितीसाठी पाठबळ मिळेल. महाराष्ट्रातील कलावंतांचा विचार करून रेल्वे आणि बस मध्ये अधिसूचिधारक पत्रकाराप्रमाणेच सवलती उपलब्ध करून द्याव्यात. घरकुल योजनेत कलाकारांना म्हाडाच्या धरतीवर ग्रामीण भागात सुद्धा प्राधान्यक्रम देण्यात यावा. कलाकारांकडे कुठल्याही प्रकारचे इन्कम प्रूफ नसल्यामुळे अनेकदा कलाकारांना कर्जापासून वंचित राहावं लागतं. त्यामुळे येत्या काळात मराठी चित्रपट असोसिएशन कलाकारांसाठी समर्पित असलेली बँकची उभारणी सुद्धा करणार असल्याचं यावेळी बैठकीत प्रामुख्याने ठरविण्यात आलं. येत्या काळात ओटीपी प्लॅटफॉर्म सारखे प्लॅटफॉर्म सुद्धा मराठी चित्रपट असोसिएशन सुरू करणार मराठी चित्रपट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवचे आयोजन करण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मराठी चित्रपट असोसिएशनचे मुख्य कार्यालय मुंबई येथे स्थित आहे तर येत्या काळात पुणे संभाजीनगर नाशिक अकोला नागपूर अमरावती कोल्हापूर इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा कार्यालय सुरू करण्यात येतील असा निर्णय सर्वांना मध्ये बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्राचे अध्यक्षपदाची सूत्र श्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे तर मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे चंद्रकांत विसपुते यांच्या हाती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात या दोन्ही अध्यक्षांच्या मार्फत महाराष्ट्राच्या कलावंतांना न्याय व हक्कच व्यासपीठ देण्यासाठी सतत कार्यरत असतील. दोन्ही अध्यक्षांचा कार्यकाल हा तीन वर्षासाठी मर्यादित असून तीन वर्षानंतर निवडणुकीतून पुन्हा एकदा अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.लवकरच सभासद नोंदणी सुद्धा सुरू होणार असून कलाकारांसाठी पाचशे रुपये व बॅनर रजिस्ट्रेशन साठी 1000/- इतकी नाममात्र शुल्कातच नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी फी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या तुलनेत अत्यंत नाममात्र आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी दोन्ही अध्यक्षांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत मानकर यांनी केली असून नुकतेच त्यांना या संदर्भातले पत्र देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर संचालकांनाही काही जबाबदारी देण्यात आले आहे त्यामध्ये मीडिया प्रभारी म्हणून जयेश जगड, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव प्रमुखपदी मोहन दास, मार्केटिंग प्रमुखपदी श्रीरंजन सावंत, चित्रपट कलाकार समन्वयक प्रमुख पदी संदेश गौर, मराठी चित्रपट असोसिएशनच्या विदर्भ अध्यक्षपदी बंडूभाऊ अंबुसकर यांचे सुद्धा नियुक्ती करण्यात आली. यामध्ये एकूण 15 संचालक नोंदणीकृत आहेत ज्यामध्ये शाम क्षीरसागर,जयेश जगड, निरंजन सावंत, नितीन धावणे पाटील, प्रवीण तायडे, चंद्रकांत विसपुते, मोहनदास सुनील शिरसाट, प्रवीण हटकर, सुमित अंभोरे, चंद्रकांत विसपुते, बाबासाहेब पाटील, प्रशांत मानकर, संदेश गौर इत्यादी संचालक आहेत.अशी माहिती प्रसिद्ध प्रमुख प्रितेश घाटोळ यांनी दिली आहे.