BIG NEWS : शेगावमध्ये राहुल गांधींच्या ताफ्याला मनसैनिकांनी दाखवले काळे झेंडे

345 0

शेगाव : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही शेगाव मध्ये पोहोचली आहे. शेगावमध्ये त्यांची महाराष्ट्रातली दुसरी सभा लवकरच सुरू होते आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रमधले वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेगावमध्ये मनसैनिकांनी राहुल गांधी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांची महाराष्ट्रातली ही दुसरी सभा आज शेगाव मध्ये होते आहे. शेगावमध्ये गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ते बाहेर पडले त्यानंतर त्यांच्या ताफ्याला मनसैनिकांनी एका इमारतीमधून काळे झेंडे दाखवलं असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसैनिकांचा देखील मोठा ताफा हा शेगावकडे निघाला असताना पोलिसांनी चिखलीमध्येच त्यांना अडवलं त्यानंतर मनसैनिकांनी तिथेच रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन देखील केलं.

Share This News
error: Content is protected !!