पुणे पोलिसांची मोठी कारवाई : 11 लाखांचे म्याव म्याव जप्त; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची करडी नजर

487 0

पुणे : पुण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष पथक तैनात करण्यात आली असून, 11 लाख रुपयांचे म्याव म्याव अर्थात मेफेड्रॉन पुणे गुन्हे शाखा युनिट २ ने पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा येरवडा परिसरात राहणारा असून त्याच्याकडून 11 लाख रुपयांचे 53.8 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या ड्रगला कोड लँग्वेजमध्ये म्याव म्याव असे म्हटले जाते. स्टेशन परिसरातून या आरोपीला अकरा लाख रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

31 डिसेंबरच्या निमित्ताने पुणे शहरामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर पोलिसांची करडी नजर असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलीस सतर्क आहेत.

Share This News
error: Content is protected !!