‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून महेश मांजरेकरांचे बॅक आऊट ; आता हा अभिनेता करणार दिग्दर्शन …

325 0

मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात सुरू होते आहे. परंतु चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विषयी माहिती समोर येते आहे.

See the source image

मीडिया रिपोर्ट्स नुसार स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या भूमिकेतून महेश मांजरेकर यांनी बॅक आउट केले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

अधिक वाचा : घृणास्पद : या भाजी विक्रेत्याने तर हद्दच केली पार…नागरिकांनी दिला बेदम चोप; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करण्यासाठी रणदीप हुडाने कंबर कसून तयारी केली आहे. त्याच्या या मेहनतीचे अनेक वेळा वृत्त देखील प्रसिद्ध झाले आहेत.

See the source image

चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्याच आठवड्यात सुरू होणार आहे, त्यामुळे आता या चित्रपटाच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील अभिनेता रणदीप हुड्डा यानेच घेतली असल्याचे समजते आहे.

 

Share This News
error: Content is protected !!