पुणे : मुंबई,पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून, काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफ पथक तैनात ठेवण्यात आले आहेत.तर मुंबई सह कोकण पश्चिम महाराष्ट्रात मोठा पूर येण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुण्यात सोमवारी पावसाची संततधार कायम होती. मात्र सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून,पावसाने उसंत घेतली नाही.
11 Jul,बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,पश्चिम किनार्यावरील द्रोणिय स्थिती,20°N पूर्व-पश्चिम शियर,मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित;परिणामी ह्या ४-५ दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह),मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाउस,मराठवाड्यातही जोर pic.twitter.com/mYMZNxDk9U
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 11, 2022
दरम्यान दुपारी बारा वाजता खडकवासला धरणामधून 5९९५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान कोकण,पश्चिम,उत्तर महाराष्ट्रामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, अतिवृष्टी होण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे.