Top News Marathi Logo

MAHARASHTRA POLITICS : मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करेल असे मला वाटत नाही, त्याचे परिणाम…! संजय राऊत यांची राज्य सरकारवर कडाडून टीका

281 0

मुंबई : महामोर्चाच्या परवानगी वरून संजय राऊत यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानानंतरही सरकार गप्प आहे. उगाच गांडूळासाठी जीभ वळवळ करते आहे. म्हणून हा मोर्चा आहे. ही त्यांची पोट दुखी आहे. अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली आहे. सरकार निर्लज्ज आहे सत्ताधारी पक्षाला आमच्या महापुरुषांविषयी श्रद्धा नसेल तर हे सरकार लाचार आहे.

ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सुरू आहे. सीमा प्रश्न ,महाराष्ट्राचे उद्योग-व्यवसाय हे बाहेर खेचून पळवले जात आहेत,हा मोर्चा महाराष्ट्रासाठी आहे. या मोर्चासाठी कोणी परवानगी नाकारेल असे मला वाटत नाही. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे .

Share This News
error: Content is protected !!