महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच अद्याप देखील सुटलेला नाही. आज शिवसेना आणि शिवसेनेच निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? यावर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे आणि आणि शिंदे गटाचे वकील सुनावणीला हजर झाले आहेत. राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणावर खलबती सुरू असतानाच, शिवसेना आणि शिवसेनेच निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं यावर निवडणूक आयोगा पुढे युक्तीवादास दुपारी ३ वाजता सुरुवात झाली आहे.
ही सुनावणी नक्कीच महत्त्वाची आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठापुढे सत्ता संघर्षाची सुनावणी जेव्हा होईल तेव्हा आयोगाच्या या निर्णयालाही ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष आता या सुनावणीकडे लागले आहे.